पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर हा तर भारत-पाकचा दि्वपक्षीय मुद्दा, अमेरिकेची कोलांटउडी

डोनाल्ड ट्रम्प

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याबरोबर व्हाइट हाऊस येथील चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला. पंतप्रधान मोदींनी आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, असा दावा ही त्यांनी केला होता. परंतु, भारत सरकारने हा दावा फेटाळल्यानंतर अमेरिकन प्रशासनाने या मुद्द्यावरुन कोलांटउडी घेतली आहे. काश्मीर प्रश्न हा दि्वपक्षीय मुद्दा आहे. ट्रम्प प्रशासन भारत आणि पाकिस्तानचे स्वागत करतो आणि त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 

भारत आणि पाक यांच्यातील कोणत्याही यशस्वी चर्चेचा पाया हा पाकिस्तानवर आधारित आहे. ते त्यांच्या क्षेत्रातील दहशतवाद्यांविरोधात पाऊल उचलत आहेत. पंतप्रधान इमरान खान यांची वचनबद्धता पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय जबाबदारीला अनुरुप आहे. तणाव कमी करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला तसेच चर्चेसाठी अनुकूल वातावरण करणाऱ्यांना आमचे समर्थन राहिल. यामध्ये सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे दहशतवादाच्या संकटांचा सामना करणे. यासाठी सहकार्य करण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. 

काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांचा दावा खोटा, मोदींनी मदतीची मागणी केलीच नाही

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य फेटाळत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचे माध्यमांत आलेले वृत्त आम्ही ऐकले आहे. परंतु, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना अशा कोणत्याच प्रकारची विनंती केलेली नाही. 


दुसऱ्या एका टि्वटमध्ये त्यांनी म्हटले की, सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा करण्यावर भारत ठाम आहे. पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा होण्यापूर्वी त्यांनी सीमारेषेवरील दहशतवाद संपुष्टात आणावा, ही आमची अट कायम आहे. सिमला समजोता आणि लाहोर घोषणेच्या आधारे भारत आणि पाकिस्तानमध्ये सर्व मुद्द्यांवर दि्वपक्षीय स्तरावर समस्येचे निराकरण व्हावे.

'ICJ चा निकाल अंतिम, पाकला कुठेही दाद मागता येणार नाही'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:US State Department Spokesperson says Kashmir is a bilateral issue for India and Pakistan to discuss