पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरबाबत निर्णय घेण्यापूर्वी भारताने सांगितलं नाहीः अमेरिका

जम्मू-काश्मीरबाबत निर्णय घेण्यापूर्वी भारताने सांगितलं नाहीः अमेरिका

मोदी सरकारकडून जम्मू-काश्मीरला दिला गेलेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आणणे आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याच्या निर्णयावर अमेरिकेने आपले मत व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्याबाबत भारताने आम्हाला सांगितले नव्हते, असे अमेरिकेने म्हटले आहे. बुधवारी अमेरिकेने म्हटले की, भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाची आम्हाला ना माहिती दिली, ना आमचा सल्ला घेतला. 

पाकने व्यापारी संबंध तोडले, भारतीय उच्चायुक्तांनाही देश सोडण्याचे आदेश

अमेरिकेच्या विदेश विभागाच्या दक्षिण आणि मध्य आशियाई प्रकरणांच्या कार्यालयाच्या टि्वटर खात्यावरुन टि्वट करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरची विशेष संवैधानिक स्थिती रद्द करण्यासाठी पुढे जाण्यापूर्वी भारत सरकारने अमेरिकन सरकारचा ना सल्ला घेतला ना त्याची माहिती दिली, असे टि्वट त्यांनी केले.

दरम्यान, अधिकृत सूत्रांनी सोमवारी म्हटले होते की, भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांच्या (पी ५) राजनैतिक अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची तसेच दोन केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयाची माहिती दिली होती. विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अनेक अन्य देशांच्या राजनैतिकांनाही जम्मू-काश्मीर संबंधित निर्णयाबाबत सांगितले होते. 

बई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, 'जैश'कडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारताने कळवले होते, असे सूत्रांनीही सांगितले होते.