पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बगदाद विमानतळावर रॉकेट हल्ला; टॉप कमांडर कासिम सोलीमनी ठार

कासिम सोलीमनीचा खात्मा

इराकची राजधानी बगदादमधील विमानतळावर अमेरिकेने रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. इराक आणि इराणच्या अनेक टॉप कमांडरचा यामध्ये मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये इराणचा टॉप कमांडर कासिम सोलीमनी, इराकी मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहांडिससह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आंबिवलीजवळ डंपरची रेल्वेगेटला धडक

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक टॉप कमांडर ठार झाले तर इराकचे अनेक सैनिक जखमी झाले आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या क्वाड फोर्सचा कमांडर मेजर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याला अमेरिका जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

राहुल गांधी अन् प्रियांका गांधी यांना अमित शहांनी दिले चॅलेंज

बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून १ जानेवारीला हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यावेळी त्यांनी जाळपोळ सुध्दा केली होती. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता. इराकमधल्या अमेरिकेच्या दूतावासाची झालेली तोडफोडीनंतर अमेरिकेने त्या ठिकाणी सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला होता. 

महाआघाडी सरकारच्या खातेवाटपासंदर्भात पवार म्हणाले की, ...