पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अशी असेल ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची रुपरेषा

नमस्ते ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलानिया,  मुलगी इव्हान्का ट्रम्प, जावई जॅरेड कुशनर यांच्यासह  भारत भेटीवर येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. सकाळी पावणेबाराच्या सुमारास ट्रम्प यांचे भारतात आगमन होणार आहे. ३६ तासांचा ट्रम्प यांचा दौरा कसा असणार आहे यावर एक नजर 

NZ vs IND 1st Test: चौथ्या दिवशीच खेळ खल्लास!

पहिला दिवस 
- सकाळी ११.४० वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन होणार आहे. 
 - ट्रम्प दाम्पत्य १२.१५ वा. साबरमती गांधी आश्रमाला भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर साबरमती आश्रम परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 
- ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी १.०५ वा. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण होईल. ट्रम्प हे भारतीयांना संबोधीत करणार आहेत. 
- दुपारी ३.३० वा. ट्रम्प आणि मेलानिया आग्य्राला जातील. तिथे ५.१५ वा. जगप्रसिद्ध ताज महालला भेट देतील. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील.
- दिल्लीत आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

थुंकी लावून पानं पलटू नका, कर्मचाऱ्यांना आदेश

दुसरा दिवस 
 - दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर साडे दहा वाजता राजघाटवर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पाजंली अर्पण करतील.
- त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक औपचारिक बैठक होईल. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
-  त्यानंतर राष्ट्रपतींसोबत रात्रीच्या भोजनाचा समारंभ असेल. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर ट्रम्प अमेरिकेसाठी रवाना होतील. 

JNU त घुसलेल्या अतिरेक्यांच काय झालं? ठाकरेंचा शहांना सवाल