पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हाफीज सईदच्या अटकेवर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; दोन वर्षाचा दबाव कामी आला

डोनाल्ड ट्रम्प

मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाफीज सईदच्या अटकेचे स्वागत केले. दोन वर्षाचा दबाव अखेर कामी आला असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. हाफीज सईदच्या अटकेनंतर डोनाल्ड ट्रम यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, '१० वर्षाच्या शोधानंतर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा तथाकथित मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या शोधासाठी गेल्या दोन वर्षात पाकिस्तानवर मोठा दबाव टाकण्यात आला होता.

'हाफिज सईदला अटक केल्याचे सांगून पाकिस्तान जगाला वेडं बनवतंय'

हाफिज सईदला बुधवारी पाकिस्तानमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर त्याला ताबडतोब दहशतवादी विरोधी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना कडक पोलीस बंदोबस्तामध्ये तुरुंगात नेण्यात आले. ज्याठिकाणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ शिक्षा भोगत आहेत त्याच तुरुंगात हाफीज सईदची रवानगी करण्यात आली आहे. २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे हाफिज सईदचा हात होता. त्याचबरोबर २००६ मध्ये मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधारही तोच होता.

कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला अटक