पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या तारखांची घोषणा झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिन्यात म्हणजे २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. व्हाइट हाऊसने सोमवारी ही माहिती दिली. आपल्या भारत दौऱ्यावर ट्रम्प नवी दिल्ली आणि गुजरातला जातील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात त्यांची पत्नी मेलानिया याही त्यांच्याबरोबर असतील. 

काँग्रेस नेता हार्दिक पटेल गायब? त्यांच्या पत्नीने केला दावा

याबाबत व्हाइट हाऊसने टि्वट केले आहे. टि्वटमध्ये म्हटले आहे की, हा दौरा अमेरिका-भारताच्या रणनीतिक भागिदारीला आणखी मजबूत करेल. तसेच अमेरिका आणि भारतीय नागरिकांमध्ये मजबूत संबंध प्रस्थापित करेल. 

ह्यूस्टनमध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणेच ट्रम्प यांच्यासाठीही कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. तिथे 'हाऊडी मोदी'च्या धर्तीवर हा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. अद्याप या कार्यक्रमाची निश्चिती झालेली नाही. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सहभागी होऊ शकतात.

देशातील पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

अमेरिकेतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'हाऊडी ट्रम्प'चे आयोजन केले जाऊ शकते. अमेरिकेत गुजराती वंशाचे नागरिक जास्त असल्यामुळे त्या अहमदाबादमध्ये या क्रार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये भारतीय प्रवासी एक महत्त्वाची व्होट बँक आहे. 

अडाणी डॉक्टरच्या हातात अर्थव्यवस्था, चिदंबरम यांची टीका

या दौऱ्यात ट्रम्प आणि मोदी हे व्यापारी करारावर हस्ताक्षर करु शकतात. तसेच गेल्यावर्षी मागे घेतलेले व्यापारी लाभ पुन्हा भारताला प्रदान केले जाऊ शकते.