पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औषध देण्याच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी मानले मोदींचे आभार

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

अमेरिकेत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूमुळे अमेरिकेत २४ तासांत २००० नागरिकांचा मृत्यू होत आहे. अशातच अमेरिकेने मागणी केलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाच्या निर्यातीला भारताने मंजुरी दिली. औषध देण्यास मंजुरी दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदलला आहे. ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे. भारताने केलेली ही मदत अमेरिका कधीच विसणार नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.  

कोरोना: आर्थिक अडचणीत करदात्यांना मोठा दिलासा!

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. ज्यांनी आमच्या विनंतीला मंजुरी दिली. ते मोठ्या मनाचे आहेत. आम्ही त्यांनी केलेली मदत कधीच विसणार नाही. तसंच, आव्हानात्मक काळात मित्रांचे सहकार्य आवश्यक असते. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्णयाबद्दल आम्ही भारत आणि भारतीयांचे आभार मानतो. मोदींचे मजबूत नेतृत्व केवळ भारतालाच नाही तर आव्हानाला सामोरे जाणाऱ्या मानवतेलाही मदत करेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. 

कोविड -१९: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'लर्न फ्रॉम होम'चा उपक्रम

दरम्यान, याआधी भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधे दिले नाही तर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र मंगळवारी त्यांनी नमती भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औषधे निर्यातीसंदर्भातील धोरणाला त्यांनी पाठिंबा दिला. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध हे मलेरियारोधक आहे. या औषधाचा भारत एक प्रमुख निर्यातदार आहे.

मुंबईकरांनो मास्क वापरा, अन्यथा अटकेची कारवाई होईल!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:us president donald trump thanks pm-narendra modi and india after supply of hydroxychloroquine