पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेलंगणात चाहत्याने घरीच उभारला डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा

तेलंगणात चाहत्याने घरीच उभारला डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा (ANI)

तेलंगणात एका चाहत्याने आपल्या घरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सहा फूट उंचीचा पुतळा उभारला असून तो रोज या पुतळ्याची देवाप्रमाणे पूजाही करतो. बुस्सा कृष्णा (३२) असे या चाहत्याचे नाव असून ट्रम्प यांचे खंबीर नेतृत्व आवडत असल्याचे त्याने म्हटले आहे. कृष्णाने ट्रम्प यांच्या जन्मदिनी म्हणजे १४ जून रोजी त्यांचा ६ फुटाचा पुतळा उभा केला आहे. त्याने फक्त पुतळाच उभा केला नाही तर दुधाने त्यांचा अभिषेकही केला.

बुस्सा कृष्णा हा जानगाव जिल्ह्यातील कोन्ने गावाचा रहिवासी आहे. शेती हा त्याचा व्यवसाय आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या व्यापारावरून तणावाचे वातावरण असले तरी कृष्णा हा ट्रम्प यांचा मोठा समर्थक आहे. 

त्याने आपल्या घरातच ट्रम्प यांचा पुतळा उभारला आहे. नुकतेच त्याने या पुतळ्याचे अनावरण केले. त्याने पुतळ्याला कुंकवाचा टिळा लावला, अभिषेक केला तसेच 'जय जय ट्रम्प' ही आरतीही केली. त्याने ग्रामस्थांना मेजवानीही दिली. १४ जून १९४६ साली जन्मलेल्या ट्रम्प हे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार आपल्या हाती घेतला होता.