पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी माझे आवडते, पण भारताशी तूर्त व्यापार करार नाही - डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. पण या दौऱ्यापूर्वी त्यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. या दौऱ्यात भारताशी कोणताही व्यापार करार करण्यात येणार नाही. भारताशी व्यापार करारचा नंतर विचार करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

शिवभोजन योजनेचा विस्तार, थाळीची संख्या दुप्पट

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची मुदत या वर्षाअखेर संपुष्टात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी हा करार होऊ शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केली आहे. ते माझे आवडते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत दौऱ्याबद्दल आपण खूप उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकीवेळेप्रमाणे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारताशी व्यापार करार करण्यात येऊ शकतो. पण तो सध्या होऊ शकणार नाही. हा करार आम्ही नंतरसाठी राखून ठेवतो आहोत. करार होणार हे नक्की आहे. पण तो अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता कमी आहे. 

राज्यात शिवजयंतीचा उत्साह; राज्यपालांनी केले शिवरायांना अभिवादन

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या भेटीमध्ये केवळ लहान स्वरुपाचा एखादा करार होऊ शकतो. २४ तारखेला डोनाल्ड ट्रम्प भारतात येत आहेत. ते दिल्ली आणि अहमदाबाद या दोन्ही ठिकाणी जाणार आहेत. अहमदाबादमध्ये त्यांच्यासाठी मोटेरा स्टेडियमध्ये मोठा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.