पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीस तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार

डोनाल्ड ट्रम्प

काश्मीर प्रश्नावर आपण भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास तयार आहोत, याचा पुनरुच्चार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भेटीवेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे या प्रश्नावर मध्यस्थी करण्याची मागणी केली होती, असा दावा केला होता. पण भारताने लगेचच ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता. त्याचबरोबर काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांचा द्विपक्षीय प्रश्न आहे. त्यामध्ये अन्य कोणत्याही देशाने लक्ष घालण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते. एवढे सगळे घडल्यानंतरही भारताने या प्रश्नी काय म्हटले आहे हे जणू काही आपल्याला माहिती नसल्याचेच दाखवत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा या प्रश्नावर मध्यस्थीस आपण तयार असल्याचे म्हटले आहे.

राम मंदिर प्रश्नावर एकमत नाही, मध्यस्थ समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात

'व्हाईट हाऊस'मध्ये पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर त्यांना या प्रश्नावर कोणी मदत करावी असे वाटत असेल. तर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे. या संदर्भात मी पाकिस्तानशी बोललो आहे. भारताशी माझे मोकळेपणाने बोलणे झाले आहे. जर त्यांना वाटत असेल, तर मी लक्ष घालण्यास तयार आहे. 

अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओढू नका : प्रियांका गांधी

काश्मीरप्रश्नी कोणत्याही तिसऱ्या देशाने मध्यस्थी करण्यास भारताने कायम विरोध केला आहे. पण त्याचवेळी पाकिस्तानकडून या प्रश्नावर अन्य देशाने मध्यस्थी करण्याची मागणी कायम केली जाते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधीच्या विधानावरून देशात मोठा गोंधळ उडाला होता. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला संसदेत धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. नरेंद्र मोदी यांनी कधीही काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मध्यस्थी करण्याची मागणी केलेली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.