पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोनाल्ड ट्रम्प २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान भारतात येण्याची शक्यता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान भारतात येण्याची शक्यता आहे.  'हाऊडी मोदी' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारतातही ट्रम्प यांच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, त्यांना या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची साथ लाभेल असं म्हटलं जात आहे. हा कार्यक्रम अहमदाबादमध्ये आयोजीत केला जाईल असं म्हटलं जात आहे, मात्र सुत्रांच्या माहितीनुसार अद्यापही कार्यक्रमाचे स्थळ निश्चित झालेले नाही. 

मोदी आता शाहीन बागेत का जात नाहीतः काँग्रेस

दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये अमेरिकन सरकारनं २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान काही रुम्स बुक केल्या आहेत त्यात एक आलिशान रुमचाही समावेश आहे अशी माहिती कार्यक्रमाशी निगडीत सुत्रांनी हिंदुस्थान टाइम्सला दिली आहे. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि बिल क्लिंटन भारत दौऱ्यादरम्यान याच हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. 

CAA: पुरावे देत राहुल गांधी म्हणाले, यूपीत खूप चुकीचं झालं

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात ट्रम्प आणि मोदी यांच्यात एका छोट्या व्यापार करारावर स्वाक्षरी होईल असंही समजत आहे. गेल्यावर्षी भारतीय व्यापाऱ्यावर घालण्यात आलेले निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.