पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परिणाम भोगावे लागतील, ट्रम्प यांची चीनला धमकी

डोनाल्ड ट्रम्प

कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला चुकीची माहिती देण्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. या विषाणूचा फैलाव वुहान शहरातून सुरु झाला होता आणि यामुळे आतापर्यंत १,१९,६६६ जणांचा बळी गेला आहे. तर २० लाख लोकांना याची लागण झाली आहे. 

COVID -19: वरळी आणि धारावीत ड्रोनद्वारे पोलिस देणार सूचना

चीन अजून दुष्परिणाम का भोगत नाही, असा सवाल व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने वारंवार ट्रम्प यांना विचारला होता. त्यावर ट्रम्प म्हणाले की, चीन दुष्परिणाम भोगत नाही, हे तुम्हाला कसं समजलं ? मी तुम्हाला काही सांगणार नाही. नाहीतर चीनला याची माहिती होईल, आणि मी तुम्हाला का सांगू?, असा प्रतिसवालही केला. 

कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर क्रिकेट स्पर्धा होणे 'मुश्किल': अख्तर

दरम्यान, सिनेटर स्टिव्ह डेन्स यांनी ट्रम्प यांना पत्र लिहून आवाहन केले. ते म्हणाले की, अमेरिकन सरकार चीनवर वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांवर अवलंबून राहणे संपवले पाहिजे. अमेरिकेत औषधे बनवण्यासंबंधीच्या नोकऱ्या परत आणाव्यात. रिपब्लिकन पक्षाच्या चार खासदारांनीही चीनवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सोमवारी एक विधेयक सादर केले होते. 

कोरोनाशी लढा : राज ठाकरे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा

दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत ५ लाख ८७ हजार जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. येथे २३ हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ३७ हजार लोक बरे झाले आहेत. एकट्या न्यूयॉर्कमध्ये १.९५ लाख कोरोनाचे रुग्ण आहेत. येथे १० हजार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर न्यूजर्सी येथे ६४ हजारहून अधिक रुग्ण आहेत. येथेही २४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.