अमेरिकेत कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी भारताकडून औषध पुरवण्याची अपेक्षा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'जर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठा केला नाही तर अमेरिका जशास तसे उत्तर देईल.'
I spoke to him (PM Modi), Sunday morning & I said we appreciate it that you are allowing our supply (of Hydroxychloroquine) to come out, if he doesn't allow it to come out, that would be okay, but of course, there may be retaliation, why wouldn't there be?: US Pres Donald Trump pic.twitter.com/kntAqATp4J
— ANI (@ANI) April 6, 2020
राज्यात कोरोनाबाधितांता आकडा ८६८ वर; ७० रुग्णांना डिस्चार्ज
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की या संदर्भात मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो. मी त्यांना सांगितले की तुम्ही आमच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठा करण्याच्या मागणीला परवानगी द्यावी. जर भारताने औषधांचा पुरवठा करण्यास परवानगी दिली नाही तर आमच्याकडूनही जशास तसे उत्तर दिले जाईल.' हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध मलेरियासाठी वापरण्यात येते. या औषधाचा भारत एक प्रमुख निर्यातदार आहे.
अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या योजनांवर काम करा : नरेंद्र मोदी
दरम्यान, अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत ११५० नागरिकांचा मृत्यू झाला आहेत. तर एक दिवसापूर्वी १२०० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १० हजारांवर पोहचला आहे. तर अमेरिकेत ३ लाख ६६ हजार ६१४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.