पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अवघ्या पाच मिनिटांत कोरोनाची चाचणी, अमेरिकेत तंत्रज्ञान विकसित

कोरोना तपासणी

अमेरिकेतील अबॉट लॅबोरेटरिजने कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी एक सोपी चाचणी उपलब्ध करून दिली आहे. या चाचणीच्या माध्यमातून अवघ्या पाच मिनिटांत या विषाणूची लागण झाली आहे की नाही समजते. त्याचबरोबर ही चाचणी करणारे उपकरणही हाताळण्यास एकदम सोप्पे आहे. ते कोणत्या रुग्णालयात, दवाखान्यामध्ये सहज ठेवता येऊ शकते. येत्या एक एप्रिलपासून रोज अशी ५० हजार उपकरणे उपलब्ध करून देण्याचे अबॉट लॅबोरेटरिजने म्हटले आहे.

लॉकडाऊन: पायी घरी जाणाऱ्या ७ जणांना टेम्पोने चिरडले, चौघांचा मृत्यू

अबॉट लॅबोरेटरिजचे उपाध्यक्ष जॉन फ्रेल्स यांनी म्हटले आहे की, रुग्णाच्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्यास आणि त्याचे प्रमाण जास्त असल्यास या उपकरणाच्या माध्यमातून पाच मिनिटांत ते समोर येऊ शकते. अन्यथा ही चाचणी पूर्ण करण्यास १३ मिनिटांचा कालावधी लागू शकतो. 

अमेरिकेमध्ये अनेक राज्यांत कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने वाढते आहे. पण रुग्णांची चाचणी करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. सध्या केवळ जास्त धोका असलेल्या रुग्णांची चाचणी करण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. तुलनेत अमेरिकेत न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन या ठिकाणी संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे. 

सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यावर इन्फोसिसची कारवाई

जॉन फ्रेल्स म्हणाले, कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्यांसाठी या उपकरणाचा मोठा उपयोग होईल. त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये संसर्गाचे प्रमाण अत्यंत जास्त आहे. त्यांनाही याचा उपयोग होईल. यामुळे कोणत्याही दवाखान्यामध्ये तात्काळ चाचणी करणे आणि उपचार सुरू करणे शक्य होईल.