पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अबब! नाताळनिमित्त प्रत्येक कर्मचाऱ्याला ३५ लाख रुपयांचा बोनस

प्रातिनिधिक छायाचित्र

अमेरिकेतील मेरीलँडमधील एका खासगी कंपनीने आपल्या २०० कर्मचाऱ्यांना नाताळच्या पार्श्वभूमीवर सुखद धक्का दिला. कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना नाताळनिमित्त बोनस दिला. यासाठी कंपनीने तब्बल ७० हजार कोटी रुपये खर्च केले. स्थानिक माध्यमामध्ये आलेल्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना लाल रंगाच्या पाकिटामध्ये त्यांची बोनसची रक्कम देण्यात आली. एका कर्मचाऱ्याला सरासरी ३५ लाख रुपये बोनस देण्यात आला. कर्मचाऱ्यांना अचानकपणे हा सुखद धक्का बसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी: नागरिकत्व सुधारणा कायदा लागू

सेंट जॉन प्रॉपर्टीजचे अध्यक्ष लॉरेन्स मेक्रांटजने सांगितले की, गेल्या १४ वर्षांमध्ये कंपनीने बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवले. कंपनीसाठी ही एक मोठी घटना आहे. या उंचीवर पोहोचण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मोठी मदत केली. त्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी वेगळे करण्याचा विचार करीत होतो. बोनसच्या माध्यमातून आम्ही ते केले.

कर्मचाऱ्यांनी केलेले काम आणि कंपनीसाठी दिलेला वेळ यानुसार त्यांना बोनस देण्यात आला आहे. सर्वात कमी बोनस हा ७००० रुपये इतका आहे. जे नुकतेच कंपनीत रुजू झाले आहेत किंवा होणार आहेत त्यांना हा बोनस देण्यात येणार आहे. तर बोनसच्या रुपाने सर्वात जास्त रक्कम १.९१ कोटी रुपये काही कर्मचाऱ्यांना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

लग्न करुन देत नसल्याने मुलाने कुऱ्हाडीने केली आईची हत्या

कंपनीतील कर्मचारी स्टेफनी रिडग्वे यांनी सांगितले की मी जेव्हा पाकिट उघडले तेव्हा मला अजिबात विश्वासच बसला नाही. पाकिटामध्ये ५० हजार डॉलरची रक्कम होती. गेल्या १४ वर्षांपासून मी या कंपनीत काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले.