पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आम्हाला चीनची गरज नाही', डोनाल्ड ट्रम्प भडकले

'आम्हाला चीनची गरज नाही', डोनाल्ड ट्रम्प भडकले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल करत चीनकडून नवीन वाढीव शूल्क लावण्याच्या योजनेला प्रत्युत्तर देणार असल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना चीन सोडण्यास सांगितले आहे. आम्हाला चीनची गरज नाही. प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की, आम्ही त्यांच्याशिवाय आणखी चांगले असू, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या प्रगतीचा वेग कमी झाला आहे. त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेलाहा फटका बसला आहे. शेअर बाजारांची अवस्था वाईट झाली आहे.

'लष्कर'चे ६ दहशतवादी श्रीलंकेतून भारतात दाखल, तामिळनाडूत हायअलर्ट

ट्रम्प म्हणाले की, आमच्या देशाला इतक्या वर्षांत चीनमुळे अब्जावधी डॉलरचे नुकसान झालेले आहे. त्यांनी एका वर्षांत अब्जावधी डॉलर किंमतीची आमची बौद्धिक संपदा चोरली आहे, आणि त्यांना हे कायम ठेवायचे आहे. पण मी हे होऊ देणार नाही. 

पुढे ते म्हणाले की, आमच्या अमेरिकी कंपन्यांना आदेश देतो की, त्यांनी चीनचा पर्याय पाहणे सुरु करावे आणि आपल्या देशात येण्याचा पर्यायही खुला ठेवावा. अमेरिकेतच त्यांनी आपले उत्पादन करावे. तत्पूर्वी, चीनने शुक्रवारी अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या ७५ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर १० टक्के शूल्क लावणार असल्याचे जाहीर केले. 

अ‍ॅमेझॉनच्या वर्षावनात भीषण आग, अवकाशातूनही दिसतोय धूर

दरम्यान, ट्रम्प सरकारने १५ ऑगस्टला अमेरिका ३०० अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर १० टक्के अतिरिक्त शूल्क लावण्याची घोषणा केली होती. हे शूल्क दोन टप्प्यात १ सप्टेंबर आणि १५ डिसेंबरला लागू होणार आहे. त्याच्या प्रत्युत्तरात चीनने अमेरिकेत तयार झालेल्या वाहनांवर आणि सुट्या पार्ट्सवर २५ टक्के किंवा ५ टक्के अतिरिक्त शूल्क लावण्याची घोषणा केली. हे शूल्क १५ डिसेंबरला दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी लागू होईल, असे म्हटले.

काश्मीर प्रकरणः आता बांगलादेशनेही पाकिस्तानचे कान टोचले