पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना प्रतिबंधक लसीची मानवावर चाचणी घेण्यास अमेरिकेत सुरुवात

कोरोना प्रतिबंधक लसीची मानवावर चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे. (फोटो - एपी)

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीची मानवावर चाचणी घेण्यास अमेरिकेतील सिएटलमध्ये सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. अर्थात ही लस सर्वसामान्यांसाठी बाजारात यायला आणखी दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. वेगवेगळ्या चाचण्यामध्ये यशस्वी ठरल्यानंतर आणि आवश्यक मान्यता मिळाल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होईल.

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

या लसीचे नाव mRNA-1273 असे असून अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ती विकसित केली आहे. जैवतंत्रज्ञानातील अमेरिकी कंपनी मॉडर्ना यांचेही सहकार्य ही लस तयार करण्यासाठी घेण्यात येत आहे.

कोरोनामुळे २१ वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू

सध्या कोरोना विषाणूचे संक्रमण विविध देशांमध्ये वाढते आहे. भारतातही या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. सध्यातरी कोरोना विषाणूवर कोणताही उपचार उपलब्ध नाही. कोरोना विषाणू झालेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवणे किंवा घरात विलगीकरण पद्धतीने राहणे आणि तापावरील सामान्य औषधे घेणे एवढेच उपचार सध्या उपलब्ध आहेत. जगभरात १७५००० पेक्षा अधिक जणांना सध्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे.