पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA : शहरी नक्षली अन् काँग्रेस देशात अफवा पसरवत आहेत : PM मोदी

नरेंद्र मोदी

सुधारित नागरिकत्व कायदा देशातील जनतेच्या उज्वल भविष्यासाठी आहे, मात्र विरोधक जनतेच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही कोणतीही योजना लागू करताना धार्मिकतेला थारा दिलेलना नाही. पण काँग्रेस देशातील जनतेची दिशाभूल करुन खोट्या अफवा पसरवण्याचे काम करत आहे. मुस्लिम समाजाला भ्रमित करुन राजकारणाची पोळी भाजण्याचे काम सुरु आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन काँग्रेससह इतर विरोधकांना टोला लगावला. 

दिल्लीतील ४० लाख लोकांच्या जीवनात नवी सकाळः मोदी

लोकसभा आणि राज्यसभेत आपल्या उज्वल भविष्यासाठी जो निर्णय घेतला त्याच्या बाजूने देशातील सर्व नागरिकांनी उभे राहून जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा आणि दोन्ही सभागृहाचा सन्मान राखायला हवा, असे आवाहन मोदींनी केले. दिल्लीमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदानात आयोजित रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. माझा राग येत असेल तर त्यांनी माझा पुतळा जाळावा पण देशाच्या संपत्तीचे नुकसान करु नये, असे सांगत आंदोलन भडकवण्यात विरोधकांचा हात असल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला. पोलिसांवर दगडफेक करुन तुम्हाला काय मिळणार? असा सवालही मोदींनी यावेळी केला. 

मुस्लिमांनी घाबरु नये, भाजपच त्यांचा विकास करेलः नितीन गडकरी

देशावर संकट आल्यानंतर पोलिस जवान जनतेच्या सेवेसाठी पुढे येत असतात. पोलिस कोणाचा धर्म पाहत नाहीत. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यावर मौन बाळगून विरोधी या घटनेचे समर्थन करत आहेत, असा आरोप  देखील मोदींनी केला. शतकापासून चालणाऱ्या राजकीय पक्षाला देशात शांतता रहावी असे वाटत नाही, ते मतांचे राजकारण करत आहेत, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला.  एनआरसी केवळ आसामसाठी होते देशभरात एनआरसीविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र काँग्रेस याविषयी लोकांमध्ये अफवा पसरवण्याचे काम सुरु आहे. काँग्रेस आणि शहरी नक्षली लोकांकडून देशात अफवा पसरवत असून देशातील नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे मोदींनी म्हटले आहे.