पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेवणात कांदा दिला नाही म्हणून तरुणांकडून हॉटेलची तोडफोड

कांदा

देशभरात कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कांद्यामुळे सर्व सामान्यांच्या डोळ्याला अक्षरश: पाणी आले आहे. केरळमध्ये याच कांद्यावरुन तुफान हाणामारी झाली आहे. जेवणात कांदा देण्यास नकार दिल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना तरुणांनी मारहाण केली तसंच हॉटेलची तोडफोड केली. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये ही घटना घडली आहे. 

तुकडे-तुकडे गँगला जनेतेने धडा शिकवावाः अमित शहा

तिरुअनंतपुरमच्या कैथमुक्कुल येथे असलेल्या 'होमली मील्स' या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. बुधवारी रात्री काही तरुण या हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यांनी मासांहारी जेवण ऑर्डर केले. त्यांना जेवणासोबत कापलेले कांदे दिले होते. मात्र या तरुणांनी पुन्हा कांदा मागितला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी कादा देण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणांनी या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. 

किचनमध्ये मृतावस्थेत आढळली टीव्ही अभिनेत्री

हॉटेल मालकाने सांगितले की, वादानंतर हे तरुण हॉटेलमधून निघून गेले. थोड्यावेळाने ते परत आपल्या मित्रांना घेऊन हॉटेलवर आले. त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी त्यांनी हॉटेलची तोडफोड सुध्दा केली. यामध्ये हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.  मारहाण करणाऱ्या तरुणांनी दारु प्यायली होती. 

धक्कादायक: ग्रहणकाळात तीन विशेष मुलांना जमिनीत पुरले