पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक!, शाळेत विद्यार्थिनींचे लेगिन्स काढले

प्रातिनिधिक छायाचित्र

शाळेमध्ये पहिलीतील मुलींचे लेगिन्स काढायला लावल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. शाळेतील शिक्षकांच्या या कृतीविरोधात आता पालकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. सोमवारपासून बिरभूम जिल्ह्यात पालकांचे आंदोलन चर्चेचा विषय झाला आहे. बिरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथे ही शाळा आहे.

अयोध्या प्रकरणः डिसेंबरमध्ये दाखल होणार पुनर्विचार याचिका

गेल्या काही दिवसांपासून हवेतील गारवा वाढला असून, थंडी पडायला लागली आहे. यामुळे काही पालकांनी आपल्या मुलींना शाळेच्या गणवेशासोबत लेगिन्सही घातले होते. पण शाळेत गेल्यावर विद्यार्थिनींना त्यांचे लेगिन्स काढण्यास सांगण्यात आले. शाळेच्या नियमांचे पालन केले गेलेच पाहिजे. कोणीही नियम तोडू नये, असे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे होते. शाळेच्या व्यवस्थापनाने या प्रकरणी माफीही मागितली आहे. 

सोमवारी या प्रकरणी शांतीनिकेतन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पश्चिम बंगालमधील बालकांचे हक्क आयोगाच्या अध्यक्षा अनन्या चक्रवर्ती म्हणाल्या, ही घटना धक्कादायक आहे. आम्ही या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.    

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या 'ब्ल्यूप्रिंट'वर आज होणार शिक्कामोर्तब

शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना फर्नांडिस म्हणाल्या, शाळेच्या नियमात न बसणारे कपडे अनेकवेळा काही पालकांकडून विद्यार्थ्यांना घातले जातात. त्याबद्दल आम्ही अनेकवेळा ताकीद दिली आहे. पण अशा पद्धतीने विद्यार्थिनींचे लेगिन्स काढणे चुकीचेच आहे. आम्ही माफी मागितली आहे. तरीही पालक का आंदोलन करताहेत मला कळत नाही. मी या संदर्भात संबंधित शिक्षकांशी बोलणार आहे.