पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२४ तासांत कोरोनाचे देशात ४७ मृत्यू, १९७५ नवीन रुग्ण

२४ तासांत कोरोनाचे देशात ४७ मृत्यू, १९७५ नवीन रुग्ण

भारतात विदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूने संक्रमित होणाऱ्यांची संख्या रविवारी २६,९१७ इतकी झाली. आरोग्य मंत्रालयाने रविवारी आकडेवारी जाहीर केली. त्यात कोविड-१९ मुळे ८२६ जणांचा मृत्यू झाला आणि सध्या एकूण २०,१७७ व्यक्ती संक्रमित आहेत. मागील २४ तासांत १९७५ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर ४७ लोकांना या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मागील २४ तासांत कोरोनातून ५९४ लोक बरे झाले आहेत. एकूण बरे होणाऱ्यांची ५९१४ इतकी झाली आहे. 

तबलिगी जमातीबाबत मोहन भागवत म्हणाले...

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणू देशातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरला आहे. महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

३ मे नंतरही लॉकडाऊन?, अनेक राज्ये कालावधी वाढण्यास तयार

मध्य प्रदेशमध्ये ९९, गुजरातमध्ये १३३ आणि उत्तर प्रदेश आणि दिल्लीत क्रमशः २९ आणि ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचे सर्वाधिक संक्रमणाचे प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत येथे ७६२८ प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर ३०७१ प्रकरणांसह गुजरात तर २६२५ सह दिल्ली तिसऱ्या स्थानी आहेत.