पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव बलात्कार: ९० टक्के भाजलेल्या पीडितेवर दिल्लीत उपचार

उन्नाव येथील सामूहिक बलात्कारातील पीडितेला उपचारासाठी दिल्लीत आणण्यात आले.

उत्तर प्रदेशमधील उन्नावमधील बलात्कार पीडितेला आरोपींनी पेटवल्याची गंभीर घटना गुरुवारी सकाळी घडली. पीडिता गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकावर निघाली होती. तिला रायबरेलीला जायचे होते. त्यावेळीच आरोपींनी तिला थांबवले आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संबंधित पीडितेला आधी उन्नावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला कानपूरमध्ये हलविण्यात आले. मात्र पीडित महिला ९० टक्के भाजली असून तिची अवस्था नाजूक असल्यामुळे  पुढील उपचारासाठी तिल्ला दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पीडितेला विमानातून दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.

VIDEO: घातपाताचा कट उधळला; १५ किलो स्फोटकं निकामी

पीडिते तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी तिच्यावर हल्ला केला. आधी तिच्या डोक्यावर मारण्यात आले. त्यानंतर चाकूच्या साह्याने तिच्या गळ्याजवळ वार करण्यात आले. त्यानंतर काही जणांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले.

या घटनेनंतर जवळपास असलेले काही लोक धावत पीडितेच्या मदतीला आले. इतर लोक येत असल्याचे बघितल्यावर आरोपी तेथून पळून गेले. स्थानिकांनी लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. 

मुंबईत शिवसेनेला धक्का; ४०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उन्नावचे पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, अन्य तिघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत. पीडित तरुणीने मार्च २०१९ मध्ये या आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.