पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! आई, बहिणीच्या मृतदेहांसोबत दोन महिने ती राहात होती एकाच घरात

प्रातिनिधिक छायाचित्र

उत्तर प्रदेशात अयोध्येमध्ये एक महिला आपल्या आई आणि बहिणीच्या मृतदेहांसोबत दोन महिने घरात राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अयोध्येतील देवकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श नगर कॉलनीमध्ये असलेल्या एका घरातून अत्यंत उग्र वास येत असल्याची तक्रार आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांकडे केली. 

नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आता राहुल गांधी म्हणतात...

पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत संबंधित घराचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला. यावेळी दीपा नावाची एक महिला तिथे झोपलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी तिथे तिची आई पुष्पा श्रीवास्तव आणि बहिण विभा यांचे मृतदेहही होते. दीपाच्या वडिलांचे १९९० मध्येच निधन झाले. ते उत्तर प्रदेशात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर या घरामध्ये दीपा तिची आई आणि दोन बहिणींसोबत राहात होती. यापैकी एका बहिणीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.

कोणाच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही, संजय राऊत यांचे वक्तव्य

बहिणीच्या मृत्यूनंतर दीपा तिची आई आणि अन्य बहिण या सर्वांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्या तिघीही आजूबाजूला राहणाऱ्या कोणाशीही बोलत नव्हत्या. या दोन्ही मृतदेहाचे पूर्णपणे विघटन झाले होते आणि त्यांच्या शरीरातील हाडेही दिसायला लागली होती. त्यावरूनच दोन महिन्यांपूर्वी दीपाची आई पुष्पा आणि बहिण विभा यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.