पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तर प्रदेश पोलिसांची करामत, मृत व्यक्तीला पाठविली हिंसाचार केल्याची नोटीस

बन्ने खान

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका कृतीमुळे ते सध्या टीकेचे धनी झाले आहेत. सहा वर्षांपूर्वी मृत पावलेल्या एका व्यक्तीच्या नावे त्यांनी एक नोटीस बजावली. बन्ने खान असे या व्यक्तीचे नाव आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पण फिरोजाबादमध्ये २० डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बन्ने खान यांच्याविरोधात नोटीस बजावली. या प्रकारावरून बन्ने खान यांच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला.

बन्ने खान यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, जेव्हा पोलिस आमच्या घरी आले आणि त्यांनी बन्ने खान यांच्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी आम्हाला धक्काच बसला. बन्ने खान यांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झाले. ते जर आज असते तर १०० वर्षांचे असते. पोलिसांनी मृत व्यक्तीकडून एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक्याची मागणी नोटिसीमध्ये केली होती.

विश्वासघाताने येतात ते विश्वासघातच करतात: फडणवीस

या संदर्भात प्रगतीशील समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अझीम भाई म्हणाले, उत्तर प्रदेशात अल्पसंख्याकांविरोधात पोलिस कशी आक्रमक कारवाई करते आहे, याचेच हे उदाहरण आहे. पोलिस कशा पद्धतीने काम करतात, यावरच या प्रकारामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ज्यांनी शहरात हिंसाचार केला त्यांना पोलिस नोटीस बजावत आहेत. पण मृत व्यक्ती कशी काय हिंसाचार करू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे स्वतःकडे फक्त सामान्य प्रशासन खाते ठेवण्याची शक्यता

फिरोजाबादचे पोलिस अधीक्षक प्रबल प्रताप सिंह यांनी अशा प्रकारे मृत व्यक्तीला नोटीस बजावली जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे. नक्की काय घडले आहे, याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.