पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आंदोलकांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा व्हिडिओ उत्तर प्रदेश पोलिसांकडून जारी

निळ्या जॅकेटमधील व्यक्तीच्या हातात बंदूक आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याला आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये काही जणांनी थेट पोलिसांवर गोळीबार केल्याचा व्हिडिओ पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये काहींनी पोलिसांना लक्ष्य केले. त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी असे कृत्य करणाऱ्यांचा पर्दाफाश केला. 

'...या पुढे यु-टर्न हा उद्धव ठाकरे टर्न म्हणून ओळखला जाईल'

पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण पोलिसांच्या दिशेने गोळीबार करीत असल्याचे दिसते. गेल्या शुक्रवारी मेरठमध्ये निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. यावेळी काही आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळही केली होती. संपूर्ण उत्तर प्रदेशात या कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

एका व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचे जॅकेट घालून एक तरूण फिरताना दिसतो. त्याच्याकडे बंदूक असल्याचेही दिसते. हिंसक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केवळ छर्रे असलेल्या बंदुका वापरल्या होत्या. यामध्ये केवळ हिंसक आंदोलक जखमी होऊ शकतात. केवळ बिजनोरमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हिंसक आंदोलकांचा मृत्यू झाला होता, याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिला होता. 

सेबीच्या अतिरिक्त निधीतील ती रक्कम ताब्यात घेण्यावर सरकार ठाम

उत्तर प्रदेशात एकूण २१ जिल्ह्यांमध्ये झालेल्या आंदोलनात हिंसक निदर्शकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २८८ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी ६२ जणांना शस्त्रांमुळे जखमा झाल्या आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ पी सिंग यांनी दिली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:UP Police releases video of Meerut violence showing protesters shooting at cops during anti CAA protests