पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह हत्येप्रकरणी तिघांना अटक

स्मृती इराणी या स्वतः अंत्यविधीसाठी बरौलियामध्ये आल्या होत्या.

उत्तर प्रदेशात अमेठीतील भाजप खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय असलेल्या सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी तिघांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. याप्रकरणात अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. सुरेंद्र सिंह आणि आरोपींमध्ये जुना राजकीय वाद होता. त्यातूनच त्यांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमेठीत स्मृती इराणींच्या निकटवर्तीय भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

बरौलिया गावचे माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांना लगचेच उपचारांसाठी लखनऊला पाठविण्यात आले होते. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी रविवारी पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वसीम, नसीम, गोलू, धर्मनाथ आणि रामचंद्र यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

लोकसभेची निवडणूक आणि यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वैयक्तिक भांडणातून ही हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सुरेंद्र सिंह हे स्मृती इराणी यांचे एकदम जवळचे मानले जात होते. त्या स्वतः अंत्यविधीसाठी बरौलिया गावात गेल्या होत्या. सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केल्यावर त्या भावूक झाल्या होत्या. त्यांनी सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला खांदाही दिला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:up police arrested three men in connection with smriti iranis close aide surender singh shot dead in amethi