काही लोकांना कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीचं गांभीर्य अद्यापही समजलं नाही असंच दिसतंय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमध्ये लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला. मात्र रामपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन सामोसे हवेत अशा विचित्र मागणीचा तगादा लावला. कंट्रोलरुमनं वारंवार ताकीद देऊनही हा माणूस सतत फोन करून त्रास देऊ लागला.
'लॉकडाऊनमुळे राज्यात १० हजार टन ताजी मासळी समुद्रात फेकली'
अखेर अधिकाऱ्यांकडून त्याची ही सामोसे खाण्याची इच्छा पूर्ण करण्यात आली, मात्र त्याला खास 'प्रसाद'ही देण्यात आला. कर्तव्य बजावत असताना पोलिस आणि कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या या व्यक्तीला अद्दल घडावी म्हणून त्याच्याकडून नाला साफ करून घेण्यात आला.
4 समोसा भिजवा दो... चेतावनी के बाद आखिर भिजवाना ही पड़ा।
— DM Rampur (@DeoRampur) March 29, 2020
अनावश्यक मांग कर कंट्रोल रूम को परेशान करने वाले व्यक्ति से सामाजिक कार्य के तहत् नाली सफाई का कार्य कराया गया। pic.twitter.com/88aFRxZpt2
रामपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. सामोसे पाहिजे म्हणून सतत कंट्रोलरुमला फोन करुन त्रास देणाऱ्या या व्यक्तीकडून नाला साफ करुन समाजसेवा करुन घेतली असं ट्विट करण्यात आलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.
आसारामला कोरोनाची भीती, सुब्रमण्यम स्वामींकडून सुटकेची मागणी