पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपतून निलंबित आमदाराचे विधानसभा सदस्यत्वही रद्द

सेनगर विरोधात हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा

किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले उत्तर प्रदेशमधील आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. विधानसभा नियमांनुसार त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. कुलदीप सिंह सेनगर हे भाजपकडून निवडून आले होते. पण या घटनेनंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

फडणवीस म्हणाले, 'आज वो हुए मशहुर जो कभी काबिल न थे!'...

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दिल्लीतील न्यायालयाने कुलदीप सिंह सेनगर यांना बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उत्तर प्रदेशात मार्च २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते उन्नाव जिल्ह्यातील बांगरमाऊ मतदारसंघातून निवडून आले होते. 

दिल्ली हिंसाचारः गोळीबार करणाऱ्या 'त्या' युवकाला अटक

उन्नावमधील किशोरवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरविल्यानंतर भाजपने त्यांना गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये पक्षातून निलंबित केले होते. उत्तर प्रदेश विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीपकुमार दुबे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की जन्मठेपेची शिक्षा जाहीर झाली त्या दिवशीपासून कुलदीप सिंह सेनगर यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. २० डिसेंबर २०१९ पासून विधानसभेची ही जागा रिक्त असल्याचे मानण्यात येईल, असेही त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.