पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला खंडणीच्या गुन्ह्यात अटक

चिन्मयानंद यांना अटक करून नेताना

उत्तर प्रदेशमधील भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणीला बुधवारी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकानेच संबंधित तरुणीला अटक केली. या संपूर्ण प्रकारामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. आपल्या अटकेविरोधात संबंधित तरुणीने स्थानिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पण तिला जामीन देण्यास तूर्त न्यायालयाने नकार दिला. 

'वंचित', 'आप'कडून करवीरमधून एकाच व्यक्तीला उमेदवारी

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचे पोलिस महासंचालक नवीन अरोरा यांनी संबंधित तरुणीला अटक झाली असल्याचे हिंदुस्थान टाइम्सला सांगितले. चिन्मयानंद यांनी आपल्यावर बलात्कार केला आणि आपल्याला ब्लॅकमेल केले, असा आरोप तरुणीने केला होता. त्यानंतर गेल्याच आठवड्यात पोलिसांनी चिन्मयानंद यांना अटक केली होती. या प्रकरणी चिन्मयानंद यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्यावरून तिघांना पोलिसांनी अटक केली होती.

याच तिघांपैकी एक जण सातत्याने संबंधित तरुणीच्या संपर्कात होता. संजय सिंह असे त्या आरोपीचे नाव आहे. तरुणी आणि संजय सिंह यांच्यात वर्षभरात तब्बल ४२०० फोन कॉल्स झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. 

धक्कादायक, ड्रोनच्या साह्याने पाकने पंजाबमध्ये पाठवला शस्त्रसाठा

गेल्या महिन्यात २४ तारखेला संबंधित तरुणी बेपत्ता झाल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले होते. आमच्या समुदायातील एक नेता माझी छळवणूक करतो आहे, असा एक व्हिडिओ संदेश तिने सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी चिन्मयानंद यांच्यावर आरोप केले होते. चिन्मयानंद यांनीच तिला बेपत्ता केल्याचे त्यांनी म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:UP law student who accused BJP leader Chinmayanand of sexual assault arrested on extortion charges