पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओलीसनाट्य संपले! आरोपीचा खात्मा करून २० मुलांची सुटका

ओलीसनाट्य संपले

उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये गुरुवारी रात्री घडलेलं ओलीसनाट्य अखेर संपले. एनएसजी कमांडोंनी आरोपी सुभाष बाथमचा चकमकीत खात्मा करून ओलीस ठेवलेल्या २० मुलांची सुटका केली. 

सुभाष बाथम यानं गुरुवारी वाढदिवसाच्या पार्टीचा बहाणा करुन गावातील  मुलांना  संध्याकाळी घरी बोलावले होते. घरात मुलं जमल्यानंतर त्यांनी सर्वांना घरात बंदीस्त करुन ठेवले.  काही स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं बाथमच्या घराचा दरवाजा  उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं गोळीबार केला. यात तीन पोलिस आणि गावकरी जखमी झाले. तसेच कमी तीव्रतेचा बॉम्बही त्यानं पोलिसांच्या दिशेनं फेकला. आपल्याजवळ ३० किलो स्फोटकं असल्याचं सांगून त्यानं धमकावण्याचाही प्रयत्न केला. 

सुधारित नागरिकत्व कायदा प्रत्येक गरिबाच्या विरोधात :उर्मिला मातोंडकर

मुलांच्या सुटकेची कारवाई तब्बल ८ तास चालली. गावातील मुलांना ओलीस ठेवण्याचा कट त्यानं खूप आधीपासून रचला होता अशीही माहिती पोलिसांनी दिली.  पोलिसांनी सातत्यानं आरोपीशी चर्चा करुन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रांच्या मदतीनं त्याला समजावून पाहिलं. मात्र, त्यानं पोलिसांचं आवाहन धुडकावून लावलं, अशी माहिती यूपीचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी दिली.

 अखेर प्रसंगाचं गांभीर्य पाहता एनएसजी  कमांडोंनी परिस्थितीचा ताबा घेतला. काही वेळातच एनएसजीचं पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई करत त्यांनी आरोपीचा खात्मा केला. 

जामिया गोळीबाराच्या घटनेनंतर प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा