पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यूपी बार कौन्सिलच्या महिला अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

दरवेश यादव

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे बार कौन्सिलच्या अध्यक्षा दरवेश यादव यांची बुधवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका स्वागत समारंभात दिवसाढवळ्या त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मारेकरीही वकीलच होता. त्यानेही नंतर स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. आरोपी वकिलाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

हर्षवर्धन जाधवांनी स्वतःच्या आई-वडिलांची हत्या केलीः चंद्रकांत खैरे

उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्षा ३८ वर्षीय दरवेश यादव यांच्यावर न्यायालय परिसरात गोळ्या झाडण्यात आल्या. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांच्या स्वागत समारंभानंतर दिवाणी न्यायालयातच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आरोपीचे नाव मनीष शर्मा असल्याचे सांगण्यात येते. ही घटना नवीन आग्रा येथील न्यायालयाच्या परिसरात घडली. मृतदेह शवविच्छेदनास पाठवण्यात आला आहे. आरोपी मनीष शर्माने यादव यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यात यादव यांचा जागीच मृत्यू झाला.

... त्याने स्वतःच्या मुलीवरही बलात्कार केला होता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:UP Bar Council president Darvesh Singh shot dead in Agra civil court two days after her election