पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नावमध्ये जाळण्यात आलेल्या बलात्कार पीडितेचा उपचारांवेळी मृत्यू

बलात्कार करणाऱ्यांविरोधात निदर्शने करण्यात आली.

उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये पाच नराधमांनी जाळलेल्या बलात्कार पीडितेचा उपचारांदरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. पीडिता ९० टक्के भाजली होती. तिला उपचारांसाठी नवी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण शुक्रवारी रात्री ११.४० वाजता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

INDvsWI T20I : कोहलीने षटकाराने साकारला 'विराट' विजय

सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला शुक्रवारी रात्री ११.१० वाजता ह्रदयविकाराचा झटका आला. आम्ही तातडीने उपचार सुरू केले. पण यामध्ये तिचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

उन्नावमध्ये या पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी ती सकाळी रेल्वे स्थानकावर जात असताना पाच जणांनी तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर रॉकेल ओतून तिला जाळण्यात आले. यामध्ये ती ९० टक्के भाजली होती. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. पीडितेला उपचारांसाठी नवी दिल्लीला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तिला एअर अँम्बुलन्सने सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले होते. 

हैदराबाद एन्काऊंटरवर राज ठाकरे म्हणाले की,...

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लखनऊच्या विभागीय आयुक्तांनी पाच सदस्यीय विशेष तपास पथक नेमले आहे. उन्नावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनोद पांडे हे या तपास पथकाचे नेतृत्त्व करणार आहेत.