पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडितेच्या वकिलाला एम्स रुग्णालयात हलवले

दिल्ली एम्स

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या गाडीला रायबरेली येथे अपघात झाला होता. या अपघातामध्ये पीडित तरुणीचे वकील गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लखनऊ येथे उपचरा सुरु होते. आज सकाळी त्यांना लखनऊ विमानतळावर एयरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात आले. पीडित तरुणीसोबत तिच्या वकिलावर देखील एम्स रुग्णालयात पुढील उपचार होणार आहेत.

काश्मीरसंदर्भात अधिररंजन चौधरींच्या वक्तव्यानंतर लोकसभेत खडाजंगी

लखनऊ जिल्हा प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्थेत पीडित तरुणीच्या वकिलांना लखनऊच्या केजीएमयू ट्रॉमा सेंटरवरुन अमौरी विमातळावर आणले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना एअरलिफ्टच्या माध्यमातून दिल्लीला आणण्यात आले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहे. याआधी सोमवारी रात्री पीडित तरुणीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

नाशिकमध्ये 6 वाडे कोसळले; सुदैवाने जीवितहानी नाही
 
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने पीडित तरुणी आणि तिच्या वकीलाला चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सोमवारी रात्री पीडित तरुणीला एअरलिफ्टच्या सहाय्याने दिल्ली आणण्यात आले. मंगळवारी सकाळी तिच्या वकिलांना देखील दिल्लीत आणण्यात आले. दोघांवर याआधी लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते. पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 

कलम ३७० : अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं