उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र पाठवले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. या पत्रामध्ये तिने तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचे म्हटले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये रायबरेलीजवळ रविवारी पीडितेच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात एक षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे.
गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची वाट लावलीः जितेंद्र आव्हाड
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र पाठवले होते. हे पत्र १२ जुलै २०१९ रोजी पाठवण्यात आले होते. या पत्रामध्ये तिने असे लिहिले होते की, 'माझ्या घरी काही लोक येतात. तक्रार मागे घेण्यासाठी ते मला धमकी देतात. तक्रार मागे घेतली नाही तर तुझ्या पूर्ण कुटुंबाला खोट्या प्रकरणामध्ये तुरुंगात टाकू असे म्हणतात.'
तिहेरी तलाक विधेयकावरून जेडीयूचा राज्यसभेत सभात्याग
दरम्यान, पीडितेच्या गाडीला झालेल्या अपघातामध्ये तिच्या काकूचा मृत्यू झाला. रायबरेली तुरुंगात बंद असलेल्या पीडितेचे काका महेश सिंह याला पत्नी आणि मेहुणीच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी बुधवारी महेश सिंह पॅरोलवर बाहेर येणार आहे. पोलिस सुरक्षेमध्ये त्याला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात आणण्यात येणार आहे.