पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडित तरुणीला एम्समधून डिस्चार्ज

उन्नाव प्रकरणातील पीडितेला डिस्चार्ज

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तीस हजारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, पुढचे ७ दिवस पीडित तरुणीच्या राहण्याची व्यवस्था एम्सच्या ट्रामा सेंटर हॉस्टेलमध्ये करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने पीडितेसोबत तिच्या कुटुंबियांची रहाण्याची व्यवस्था दिल्लीमध्येच केली आहे. यावेळी पीडितेसोबत तिची आई, दोन बहिणी आणि भाऊ रहाणार आहेत. याप्रकरणाची सुनावणी २८ सप्टेंबरला होणार आहे. 

येत्या शुक्रवारी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार - शरद पवार

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी उन्नाव बलात्कार प्रकरणाशी जोडलेले सर्व ५ प्रकरणं दिल्लीला न्यायालयात वर्ग केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एका विशेष न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.  

सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार या फक्त अफवा: आरबीआय

दरम्यान, २८ जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे पीडित तरुणीच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये तरुणीच्या काकू आणि मावशीचा मृत्यू झाला होता. तर पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. या दोघांवर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. 

पाकिस्तानशी नव्हे, टेररिस्तानशी चर्चेला अडचण - जयशंकर