पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव प्रकरण: CBI ने दोन आठवड्यात तपास पूर्ण करावा - सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालय

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या अपघात प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्याच्या आत याप्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. उन्नाव बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सीबीआयला आणखी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या वकिलाला ५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

 

उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये ढगफूटी; ३२ नागरिकांचा मृत्यू

दरम्यान, शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सीबीआयने न्यायालयाकडे याप्रकरणाच्या तपासासाठी एक आठवड्याचा आणखी अवधी देण्याची मागणी केली होती. उन्नाव बलात्कार प्रकरणाशी संबंधित दाखल करण्यात आलेल्या ४ प्रकरणांपैकी हे एक प्रकरण आहे. तीस हजारी येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्याकडे सीबीआयने ही मागणी केली होती. याप्रकरणात शुभम सिंह, नरेश तिवारी आणि ब्रजेश सिंह यादव हे आरोपी आहेत.

... नाहीतर आम्ही पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरू - शरद पवार

उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे पीडित तरुणीच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये पीडित तरुणीची काकू आणि मावशीचा मृत्यू झाला होता. तर पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, पीडित तरुणी आणि वकीलावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहेःममता बॅनर्जी