पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी कुलदीप सिंह सेंगरची रवानगी तिहार कारागृहात

कुलदीप सिंह सेंगर

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याला आज दिल्लीतील तीस हजारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना आदेश दिले की, कुलदीप सिंह सेंगर आणि सहआरोपी शशि सिंह यांची रवानगी तिहार कारागृहात करण्यात यावी. तसंच न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. 7 ऑगस्ट रोजी याप्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.

कलम 370: केंद्राकडून लष्कर आणि वायूदलाला हाय अलर्ट जारी

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याला रविवारी संध्याकाळी सीतापूर तुरुंगातून दिल्लीला आणण्यात आले. आज दुपारी दोन वाजता त्याला तीस हजारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उन्नाव प्रकरणाशी जोडलेल्या सर्व 5 प्रकरणांना दिल्लीतील तीस हजारी न्यायालयामध्ये वर्ग करण्याचे आदेश दिले होते. तसंच या प्रकरणाची सुनावणी पुढील 45 दिवसांमध्ये करण्याचे निर्देश दिले होते. 

हा क्रांतीकारक नव्हे तर राजकीय निर्णयः सोली सोराबजी

सीबीआय उन्नाव बलात्कार प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणाशी सोडलेल्या 5 प्रकरणांपैकी 4 प्रकरणाचा तपास दिल्लीमध्ये होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 4 प्रकरण उत्तर प्रदेशवरुन दिल्लीला वर्ग करण्यात आली. तीस हजारी न्यायालयामध्ये आता याप्रकरणावर सुनावणी होणार आहे. न्यायाधिश धर्मेश शर्मा यांनी सेंगर आणि शशी सिंह यांच्याविरोधात वारंट जारी केले आहे. न्यायालयाने दोघांची रवानगी दिल्लीतील तिहार कारागृहात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये वर्ग केलेल्या प्रकरणामध्ये उन्नाव अल्पवयिन तरुणीवर बलात्कार, सामुहिक बलात्कार, पीडित तरुणीच्या वडिलांविरोधात शस्त्रास्त्र कायद्याचा गुन्हा दाखल आणि पीडितेच्या वडिलांचा तुरुंगात मृत्यू यांचा समावेश आहे. 

जम्मू-काश्मीर होणार केंद्रशासित प्रदेश; कसे बदलणार अधिकार जाणून घ्या