उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भाजपचा निलंबित आमदार कुलदीपसिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
2017 Unnao rape case: Delhi's Tis Hazari Court has also ordered BJP expelled MLA Kuldeep Singh Sengar to pay a compensation of Rs. 25 lakhs to the victim https://t.co/xfaVVsOG0X
— ANI (@ANI) December 20, 2019
दि. १७ डिसेंबर रोजी न्यायालयाने पुढील सुनावणीवेळी कुलदीपसिंह सेंगरला आपले उत्पन्न आणि संपत्तीची विस्तृत माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्याने सादर केलेल्या दस्तऐवजाच्या आधारे त्याची एकूण चल आणि अचल संपत्ती ४४ लाख रुपये असल्याचे समोर आले होते. सुनावणी दरम्यान सेंगरच्या वकिलांनी या संपत्तीचे मूल्य सध्या घटल्याचा दावा केला. कारची किंमत कमी झाली आहे. त्याचबरोबर सेंगरची मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिचे शूल्क भरल्यानंतर ही रक्कम आणखी कमी होईल असे सांगण्यात आले.
हिंसक आंदोलनाप्रकरणी अहमदाबादेत ४९ जण ताब्यात
तर पीडितेच्या वकिलांनी पीडित युवतीचे घर पूर्णपणे पडल्याचे सांगितले. त्याचबरोबर पीडितेकडे ३ भावांत अगदी थोडीसी जमीन असल्याचे म्हटले.
CAA: आसाममध्ये इंटरनेटसेवा सुरु; कायद्याला विरोध कायम
सेंगरने २०१७ मध्ये एका मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी पीडित युवती अल्पवयीन होती. न्यायालयाने सहआरोपी शशीसिंह यांच्याविरोधातही आरोप निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशमधील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेल्या सेंगरला या प्रकरणानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. न्यायालयाने ९ ऑगस्टला सेंगर आणि सिंह विरोधात कट रचणे, अपहरण, बलात्कार आणि पॉक्सो कायद्याशी संबंधित कलमांनुसार आरोप निश्चित केले होते.
पीडित युवतीच्या कारला २८ जुलै रोजी एका ट्रकने धडक दिली होती. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली होती. या अपघातात पीडित युवतीचे २ नातेवाईकांचा मृत्यू झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व पाच प्रकरणे एक ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊतील न्यायालयातून दिल्लीतील न्यायालयात हस्तांतरित केले होते.