पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगरची भाजपमधून हकालपट्टी

कुलदीप सिंह सेंगर

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. याआधी कुलदीप सिंह सेंगरला भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. मात्र पीडित तरुणीच्या गाडीला झालेल्या अपघातानंतर भाजपकडून सेंगरविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

... म्हणून त्याने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या मॉडेलचा खून 

देशाला हादरवून टाकणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर हा सध्या तुरुंगामध्ये आहे. पीडित तरुणीच्या गाडीला अपघात प्रकरणामध्ये सीबीआयने बुधवारी त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला. सेंगरसह अन्य 10 जणांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तर तपास यंत्रणांनी हत्या, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सेंगरसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

... त्यांचे ह्रदय तपासावे लागेल, शरद पवार यांचा पक्ष सोडणाऱ्यांना टोला

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या अपघात प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. रविवारी रायबरेली येथे पीडित तरुणीच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. 

भावोजी अस्त्र: आदेश बांदेकर साधणार माऊलींशी संवाद