पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव बलात्कार प्रकरण: सात पोलिसांचे निलंबन

उन्नाव बलात्कार प्रकरण

उन्नावमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला जाळल्यामुळे तिचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ७ पोलिसांना निलंबित केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेजबाबदारपणा, खटल्याशी संबंधित घटनांकडे दुर्लक्ष आणि गुन्हा रोखण्यात अपयश आल्याने ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

अमृता फडणवीस अन् प्रियांका चतुर्वेदी यांच्यात जुंपली

अप्पर मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी सांगितले की, बलात्कार पीडितेच्या मृत्यू प्रकरणात कर्तव्य बजावताना दुर्लक्ष केल्याबद्दल उन्नावच्या बिहार पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय कुमार त्रिपाठी यांच्यासह बीट प्रभारी उपनिरीक्षक अरविंद सिंह रघुवंशी, उपनिरीक्षक श्रीराम तिवारी, अब्दुल वसीम, पंकज यादव, मनोज, संदीप कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. 

 

धक्कादायक! नागपूरमध्ये ५ वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचा शुक्रवारी रात्री उशिरा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेटत नाही तोपर्यंत पीडितेवर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा तिच्या कुटुंबियांनी घेतला होता. मात्र स्थानिक नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हैदराबाद एन्काऊंटर: हुज्जत घालणाऱ्या महिला पत्रकाराला सायनाने