पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजपचा निलबिंत आमदार कुलदीप सेंगर दोषी

कुलदीप सेंगर

उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगरला दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी शिक्षेची सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. २०१७ मध्ये अपहरण आणि बलात्कार प्रकरणी सेंगरला दोषी ठरवताना न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबावरुन पोलिसांना फटकारले.

सेंगरने २०१७ मध्ये एका मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल होता. त्यावेळी पीडित युवती अल्पवयीन होती. न्यायालयाने सहआरोपी शशीसिंह यांच्याविरोधातही आरोप निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशमधील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेल्या सेंगरला या प्रकरणानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. न्यायालयाने ९ ऑगस्टला सेंगर आणि सिंह विरोधात कट रचणे, अपहरण, बलात्कार आणि पॉक्सो कायद्याशी संबंधित कलमांनुसार आरोप निश्चित केले होते. 

सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली: फडणवीस

बंद खोलीत झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी आधीच १६ डिसेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले होते. पीडित युवतीच्या कारला २८ जुलै रोजी एका ट्रकने धडक दिली होती. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली होती. या अपघातात पीडित युवतीचे २ नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. 

सर्वोच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व पाच प्रकरणे एक ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊतील न्यायालयातून दिल्लीतील न्यायालयात हस्तांतरित केले होते. 

जामिया हिंसाचार: एकाही विद्यार्थ्याचा मृत्यू झाला नाही - कुलगुरु