पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आग्रा एक्स्प्रेस वेवर ट्रक-व्हॅनमध्ये भीषण अपघात, ७ जण जिवंत जळाले

आग्रा एक्स्प्रेस वेवर ट्रक-व्हॅनमध्ये भीषण अपघात, ७ जण जिवंत जळाले

आग्रा एक्स्प्रेस वेवर रविवारी रात्री उशिरा तेल वाहतूक करणारा ट्रक आणि व्हॅनमध्ये धडक बसल्यानंतर लागलेल्या आगीत सात जण जिवंत जळाले. अपघातानंतर व्हॅन आणि ट्रकला आग लागली. एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन मृतदेह उशिरापर्यंत काढण्यात यश आले नव्हते. हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी व्हॅन कापण्यात आली. ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. 

या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. एक ट्रक मोहरीचे तेल घेऊन हरदोई येथून बांगरमऊकडे निघाला होता. तर व्हॅन बांगरमऊकडून हरदोईकडे जात होती. व्हॅनमध्ये सात जण होते. 

हरदोई-बांगरमऊ रस्त्यावरील आग्रा एक्स्प्रेस वे टोल नाक्याजवळ दोन्ही वाहनांची जोरदार धडक बसली. धडक बसल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि व्हॅनला आग लागली. व्हॅनमधील लोक आगीत लपेटले गेले. दरवाजा लॉक झाल्याने आणि काचा बंद असल्याने एकालाही बाहेर येता आले नाही. 

मृतदेहांची ओळख पटलेली नाही. ही व्हॅन अंकित वाजपेयी नावाच्या व्यक्तीच्या नावे आहे. ट्रक चालकाच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक तैनात केले आहे. मृतदेहांची ओळख पटलेली नाही.