उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे प्रेमाच्या आणाभाका घेत आरोपीने दोन वर्षांपर्यंत पीडितेचे शारीरिक शोषण केले. पीडितेने जेव्हा लग्नाचा विषय काढला तेव्हा तीन लाख रुपयांचे आमिष देऊन तिचा अडसर दूर करण्यासाठी दबाव आणला. पीडितेचे कुंटुब ऐकण्याच्या मनस्थित नाही, हे पाहून आरोपीने बिहारच्या पोलिसांमार्फत दबाव वाढवला. तरीही मागे न हटता पीडित मुलीने त्यांचा सामना केला. आरोपीला कारागृहात पाठवले. कारागृहातून सुटल्यानंतर आरोपीने पीडितेला जिवंत जाळले. या प्रकरणातील सर्व पाचही आरोपींचे चेहरे समोर आले आहेत.
'भाजपला उतरती कळा लागल्याचे महाराष्ट्रातील निकालातून स्पष्ट'
१८ जानेवारी २०१८ रोजी रायबरेली न्यायालयाने पीडित मुलगी आणि आरोपी शिवम त्रिवेदीने लग्नाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. लग्नानंतर मुलीची काळजी घेईन असे करारात लिहिले होते. तिची सर्व जबाबदारी घेईन, असेही त्यात म्हटले होते. परंतु, काही दिवसांतच त्याने या कराराला केराची टोपली दाखवली. त्याने पीडितेला सोडले. पीडितेने जेव्हा आपला हक्क सांगितला तेव्हा तिला धमकावले. गावातील पंचायतीत शिवमच्या कुटुंबीयांनी पीडितेवर दबाव आणला आणि पैसे घेऊन शिवमला सोडून जाण्यास सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कुटुंबीयांनी ३ लाख रुपये देण्याचा शब्द दिला. पंचायतीच्या प्रधानांनी या रुपयांत पीडितेला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला.
NEFT सुविधा १६ डिसेंबरपासून २४ तास सुरू
पीडितेने शिवमची पत्नी म्हणून नव्हे तर फक्त सून होण्याचा आपला हक्क मागत असल्याचे पीडितेची म्हणणे होते. यासाठी शिवमचे कुटुंबीय तयार नव्हते. संपूर्ण गावातून दबाव वाढत होता. पीडित मुलगी रुपयांच्या आमिषाला बळी पडली नाही. ती शिवमसोबत राहण्यावर अडून बसली. शिवमच्या कुटुंबीयांनी तिच्यावर आणखी दबाव वाढवला. त्यामुळे अखेर पीडितेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. शिवमला कारागृहात टाकल्यामुळे त्याचे कुटुंबीय आणखी चिडले. संधी मिळताच त्यांनी तिचा काटा काढला. आरोपींनी पीडित मुलीला जिवंत जाळले.