पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव प्रकरण: आरोपींविरोधात चार्जशीट दाखल

उन्नाव प्रकरण

उन्नाव सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर आरोपींविरोधात तीन दिवसांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रायबरेली पोलिस अधिक्षक स्वप्निल ममगई यांनी सांगितले की, 'सोमवारी रायबरेलीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्रामध्ये शिवम आणि शुभम या दोघांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांनी पुढे असे सांगितले की, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असून हा खटला रायबरेलीमध्येच चालणार आहे. 

GST मोबदला लवकर मिळाला तर विकासकामांना वेग, मुख्यमंत्र्यांचे पत्र

पोलिसांनी दावा केला आहे की, 'आरोपपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये मोबाइल फोनचे स्थान आणि उपस्थितीचा सहभाग आहे. यामध्ये अनेक लोकांनी साक्ष दिली आहे. पीडिताने दावा केला होता की डिसेंबर २०१८ मध्ये तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी मार्चमध्ये रायबरेलीच्या लालगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.  

'जे काही बोलायचे ते उद्या गोपीनाथ गडावर बोलेन'

५ डिसेंबर रोजी पीडिता रायबरेली येथील न्यायालयामध्ये जात असताना आरोपींनी तिला पेटवून दिले. यामध्ये पीडिता ९० टक्के भाजली होती. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. सोमवारी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात शिवम आणि शुभम या दोन्ही आरोपींवर बलात्कार, पुरावा नष्ट करणे आणि धमकावण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

गुजरात दंगल : नानावटी आयोगाच्या अहवालात नरेंद्र मोदींना क्लीन चीट