पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत १२०० जणांचा मृत्यू

कोरोना विषाणू

जगभरात कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असून याठिकाणी मृतांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाने १२०० नागरिकांचा बळी घेतला आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मास्कशिवाय 'नो एन्ट्री'

अमेरिकेत ३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत ३,३७,२७४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या २४ तासांत अमेरिकेत १२०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा ९,६३३ झाला आहे. 

कुपवाड्यातील चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ५ जवान शहीद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे मदत मागितली आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध पाठविण्यास सांगितले होते. त्यास उत्तर देताना भारताने सांगितले की, 'एक जबाबदार देश असल्याने आम्ही शक्य तितकी मदत करू.'

पंतप्रधान मोदींचे आवाहन, दिव्यांनी उजळला देश

चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात भितीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरात १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनाने ६९,४१९ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे.

चिंताजनक: मुंबईत एकाच दिवशी १०३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, राज्याचा आकडा ७४८ वर