पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेने केलेल्या कारवाईत आयसीसचा म्होरक्या बगदादी ठार?

अबू बकर अल बगदादी

दहशतवादी संघटना आयसीसीचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून  अमेरिकेने मोठी कारवाई सुरु केली होती. ज्यामध्ये बगदादीला अमेरिकेने लक्ष्य केले आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'काही तरी मोठे घडलं आहे', असे ट्विट केले आहे. या ट्विटमुळे चर्चांना उधाण आले आहे. या ट्विटमुळे अमेरिकेने बगदादीला ठार केले असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा

इस्लामिक स्टेटचा नेता आणि दहशतवादी अबू बकर अल बगदादीविरोधात अमेरिकन सैन्यांनी सिरियामध्ये मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये बगदादी मारला गेला असल्याच्या चर्चा सुरु आहेत. डोनाल्ड्र ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमुळे या चर्चा सुरु आहेत. त्यांनी ट्विट केले मात्र त्यातून काहीच स्पष्ट होत नाही. दरम्यान, थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. नेमकं ट्रम्प काय सांगणार आहेत. याकडे जगाचे लक्ष लागले आहे. 

शाहरुख म्हणतो, मुलगा आर्यनला अभिनय जमणार नाही