पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जॉन्सन यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांपासून माझ्या शरीरामध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याची काही लक्षणे दिसून आली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये मला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मी स्वत:ला पुढचे काही दिवस विलग केले आहे, असे जॉन्सन यांनी सांगितले. तसंच, कोरोनाशी लढा देण्याबरोबरच आपण सरकारी जबाबदारी देखील पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदवस वाढ होत चालली आहे. बुधवारी सकाळपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये ९ हजार ५२९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यूकेच्या आरोग्य विभागाने सांगितले की, मंगळवारच्या अधिकृत आकडेवारीच्या तुलनेत १ हजार ४२५ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये ४६३ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात २४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ५,३१,८६० नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.