पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटनच्या पंतप्रधानांनंतर आरोग्य मंत्र्यांनाही कोरोनाची लागण

ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक

ब्रिटनच्या पंतप्रधानांनंतर आता आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी स्वत: ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. या पुढे मी घरातूनच काम करणार आहे तसंच मी स्वत:ला विलग केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एकाच दिवसात पंतप्रधान आणि आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर याआधी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

मुंबईत कोरोनाचे आणखी ९ रुग्ण; राज्यातील बाधितांचा आकडा १५६ वर

शुक्रवारी ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी एक व्हिडिओ ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की,   'मला कोरोना विषाणूची तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तपासणी केल्यानंतर मला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने माझ्यात सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. मी आता घरून काम करत आहे आणि स्वत:ला विलग केले आहे.'

कोरोना : जयंत पाटलांच्या शहरात नवी नियमावली लागू होणार

दरम्यान, काही तासांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती ट्विट करत दिली होती. 'माझ्या शरिरामध्ये कोरोनाची काही लक्षणं आढळून आली होती. तपासणी केल्यानंतर मला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. मी स्वत:ला विलग केले.', असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये ४६३ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.