पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2019 डबल धमाका! इलेक्ट्रिकल वाहनांसह गृहकर्जदाराला 'गिफ्ट'

विद्युत वाहने आणि गृह कर्जदारांना दिलासा देणारा निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या पेठाऱ्यातून मध्यमवर्गीयांसाठी वाहन आणि गृहकर्जावर गिफ्ट दिले आहे. विद्युत वाहनावारील वस्तू आणि सेवा करात १२ टक्क्यांवरुन ५ टक्के इतकी कपात करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. सरकारच्या या निर्णयामुळे विद्युत वाहने स्वस्त होणार आहेत. याशिवाय ही वाहने कर्जावर घेणाऱ्याला करातून १ लाख ५० हजाराची सूट मिळणार आहे. 

Budget2019 : पेट्रोल-़डिझेल महागले, शेवटच्या मिनिटांत अर्थमंत्र्यांचा दणका!

वाहन खरेदीसोबतच गृहकर्जदाराला दिलासा देणारा निर्णयही सरकारने घेतला आहे. घर खरेदीसाठी १५ वर्षांच्या दिर्घकालीन गृहकर्जधारकाला करामध्ये १ लाख ५० हजार रुपये इतकी सूट मिळेल, अशी माहितीही सीतारामन यांनी आपल्या भाषणातून दिली. सध्याच्या घडीला गृहकर्जधारकाला व्याज दरावर २ लाखांची सूट दिली आहे. या निर्णयामुळे आता ४५ लाख रुपयांच्या गृह कर्जावर ३ लाख ५० हजार रुपये सूट मिळणार आहे. 

अर्थसंकल्पात 'स्टडी इन इंडिया', 'गांधीपीडिया'चा संकल्प

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: UnionBudget2019 GST rate on electric vehicles from 12 to 5 Percentage Also to make EVs affordable for consumers our Govt will provide additional income tax deduction