पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कांदा निर्यातीस बंदी, केंद्र सरकारचा निर्णय

कांदा

गगनाला भिडणाऱ्या कांद्याच्या दरामुळे देशभरात खळबळ उडाली असतानाच केंद्र सरकारने त्याच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. देशभरात कांद्याच्या तुटवड्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी केंद्रीय खाद्य पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी केंद्राकडे पुरेशा प्रमाणात कांद्याचा साठा असून विविध राज्यांना त्याचा पुरवठा केला जाईल, त्यामुळे किंमतीही घटतील, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

येत्या काही दिवसांत विविध राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या काळात जर कांद्याच्या किंमती कमी झाल्या नाहीत तर त्याचा निवडणुकांवर परिणाम होईल या भीतीने सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सरकारला कोणताही धोका पत्करायचा नसल्याचे यातून दिसून येते.

आतापर्यंत जेव्हा-जेव्हा कांद्याच्या दराने विक्रमी उडी घेतली. तेव्हा-तेव्हा त्या राज्यात सरकार कोसळल्याचे बहुतांश चित्र दिसलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Ministry of Commerce and Industry export of all varieties of onions is prohibited with immediate effect